एकच न्यारी ओळ अशी जी,
माझ्या हातून लिहिली जावी.
सुखदुःखाची गंमत सगळी,
तिच्यामध्ये सामावून घ्यावी.
शब्द असावे माझ्या मनीचे,
माझ्या ओठांवर थबकलेले.
भावना असाव्या माझ्या मनीच्या,
करतील ज्या हे डोळे ओले.
संदेश जरी मग नसेल तिच्यात,
माझे अस्तित्व प्रतिबिंबित होईल.
अशी एक सोनेरी कविता,
या जन्मात तरी मी लिहून जाईन.
---- ईरा कुलकर्णी