एक झरा वाहत होता त्याचा त्याचा एकटा, त्याच्या अंतरंगात भिनलेल्या नेहमीच्या अवखळ लयीमध्ये. आसपास असलेल्या प्रत्येक सजीवाला बोटभर का होईना स्पर्श करत तो पुढे वाहतच राहिला. काही सजीव त्याच्या इतक्या जवळ आले, की त्यांना आता त्याच्याशिवाय दुसरे जीवनच नाही! त्याच झऱ्यात जन्म झाला दोन गोंडस कळ्यांचा! जसजशा त्या मोठ्या होत गेल्या, तशा त्यासुद्धा झऱ्याच्या खळखळाटात डोलू लागल्या. मग पुढे त्यांना अजून छोट्या कळ्या, त्यांना अजून छोट्या कळ्या, अशा अनेक कळ्या येतच राहिल्या. त्या कळ्या मोठ्या झाल्यावर त्यासुद्धा झऱ्याच्या पाण्यासोबत डोलू लागल्या. पण तो झरा मात्र सदैव वाहतच राहिला.... आसपासच्या प्रत्येक सजीवाला स्पर्श करत...... प्रत्येक सजीवाला समृद्ध करत.
- ईरा कुलकर्णी
छान
ReplyDelete